Saturday, 30 April 2011
Vishnu rupini Krishna- Dakshinechi Ganga.
दक्षिण भारताची पाताळगंगा म्हणजेच कृष्णा नदी होय .हिच्याबद्दल पुराणामध्ये अशी गोष्ट आहे कि 'प्राचीन काळी ब्रह्मदेवाने ब्र्ह्मारण्यात यज्ञ केला .या यज्ञाला तीनही देव ब्रह्मा विष्णू महेश उपस्थित होते यज्ञाच्या पूर्णाहुतीच्या वेळी सावित्री साज शृंगार करण्यात गुंतल्यामुळे वेळेवर आली नाही म्हणून गायत्रीला प्राधान्य दिल्यामुळे सावित्रीला राग आला व तिने तीनही देवाना शाप दिला कि तुम्ही सर्व जळरूप व्हाल. तिच्या शापानुसार विष्णू झाले कृष्णा नदी, ब्रह्मा झाले कोयना नदी तर महेश झाले वेण्णा नदी. तीनही देवानी त्यांनाही प्रतिशाप दिला कि तुम्ही जळरूप व्हाल व अधोगतीला जाल. त्या प्रतिशापानुसार सावित्री,गायत्री,वाशिष्टी ई. देवता जळरूप होऊन सह्याद्रीवरून उगम पावून कोकणात वाहू लागल्या. महाबळेश्वरला पाच नद्या उगम पावतात. कृष्णा, कोयना, वेण्णा या तीन नद्या देशावर येतात, तर गायत्री व सावित्री उंचावरून खाली तळ कोकणात वाहतात. म्हणजेच अधोगतीला जातात. कृष्णा आणि वेण्णा या दोन नद्यांचा संगम श्री क्षेत्र माहुली येथे होतो, म्हणजेच हरी हर संगम. विष्णू रूपिणी कृष्णा व शिव रूपिणी वेण्णा म्हणजे हरिहर संगम झाला असे मनात खंत वाटून ब्रह्मरूपिणी कोयना वेगाने कृष्णेला कराड येथे मिळते. कृष्णा संथ या उलट कोयना वेगवान यांचा 'T' आकाराचा संगम कराड येथे होतो यालाच प्रीती संगम असे म्हणतात. हि पुराणातली गोष्ट म्हणजे भौगोलिक नकाशाच आहे. या रूपकात्मक गोष्टी मधून भौगोलिक सत्य दिसून येते.
Friday, 29 April 2011
Kshetra Devata.
उत्तरालक्ष्मीच्या क्षेत्रा मध्ये रत्नागिरीचा केदार, शिंगणापूरचा शंभू महादेव, नरसिंहपुरचा नरहरी, औन्धाची यमाई, देवराष्ट्राचा सागरोबा, रेठरे येथील पिंपळाई, संगमाचा योगिनी वृंद, लिंबाचा कोटेश्वर, निळाद्रीचा गुप्तलिंग, पन्हाळ्याचा पराशर, सातारचे सप्तर्षी, बहेचा रामेश्वर, माहुलीची वेण्णाई, वैराटची सोमजाई, बहुल्याचा बहुलेश्वर, महाबळेश्वरचा महाबळेश्वर व अतिबलेश्वर, दिवशीचा धारेश्वर, कराडचा हाटकेश्वर, सैदापुरचा पावकेश्वर, गोट्याचा आनंदेश्वर, गोवारी येथील चंडी, खोडशीची रेणुका, कार्वे येथील धानाई, कोरेगावची एकविरा, जखीणवाडीची सोनाई-मळाई, आगाशिवची तुकाई, वारुंजी ची वाघजाई, हजारमाची ची जानाई, प्रीतीसंगमीचा संगमेश्वर, ज्ञानदेवांचा कमळेश्वर, इंद्राचा कोटेश्वर, यमाचा धर्मेश्वर, वरुणाचा वरुणेश्वर, कुबेराचा कुबेरेश्वर, नैऋत्तीचा नैऋत्येश्वर, इशान्येचा ईशान्येश्वर, समीराचा अनिलेश्वर, अग्नीचा अनलेश, कापिलचा जाश्वनिळेश्वर, सदाशिवगड चा सदाशिव, आगाशिवचा महादेव, मालखेड चा मार्कंडेश्वर, सवाद्याचा सिद्धेश्वर, विंगाचा बाळोबा, बनपुरीचा नाईकबा, चाफळ चा दाढोबा, पालीचा खंडोबा, इंदोलीचा नरसिंह, मसूरचा भैरवनाथ, वडोली चा निळेश्वर, कोपर्डे येथील सिद्धनाथ, कडेगावची डोंगराई, टेंभूचा खोलेश्वर, कोळ्याची कोळजाई, पाचवड चा पाचवडेश्वर, तांबवे येथील केशवराज, वसंतगड येथील चंदोबा, कालगाव चा भैरोबा, सणबुर ची इठलाई, पुसेसावळी चा सावळेश्वर, कुरोली चा सिद्धेश्वर, रेणावी चा रेवण सिद्ध, वाडीचा गिरीजा शंकर,गडाचा मच्छीन्द्र, येराडवाडीचा येडोबा, पारे येथील दर्गोबा, दरूज येथील दर्याबाई, चोराडे येथील खडीआई, भूषणगडची हरणाई, सातारची मंगळाई, विट्याची सूळकाई, मांडर गड ची काळूबाई, एतगावचा धर्मराज, बत्तीस शिराळ्याचा गोरखनाथ, ललगुण चा नागोबा, म्हसवडचा सिद्धनाथ, पसरणी कोरेगाव, बावधन पेढ्याचा, भैरवगड चा ईत्यादि ठिकाणी भैरवनाथ, जरंडा येथील मारुतराय, गुरसाळे येथील रामेश्वर, वीरचा म्हस्कोबा, खरसुंडीचा सिद्धनाथ, सोनारीचा सिद्धनाथ, वर्धन गडची वर्धिनी माता, सज्जनगड ची आंगलाई, धोमचा नरसोबा, पेठचा माणकोबा, चाफळ व फलटण येथील राम, आष्टे येथील चौंडेश्वरी व औदुंबर येथील दत्त व भुवनेश्वरी या देवता समाविष्ट आहेत.
Thursday, 28 April 2011
Aarti
श्री उत्तरालक्ष्मीदेवीची आरती
कमलनिवासिनी जय महालक्ष्मी वंदन तव पदकमला ।
विरुनी जाती षडभावची हे करीता आरतीला ॥
की जननी तुझिया आरतीला ॥धृ ॥
श्रीकराने भक्तीनेही शंभू तोषविला,प्रसन्न होऊनही शम्भूनेही अमर त्यास केला ।
श्री करहाटक नाव देऊनी या पुण्य क्षेत्राला,स्वये सदाशिव परिवारासवे इथेच तो रमला।
कमळेश्वर तो कमलाहाती श्री कर शोभविले ,क्षेत्राधिपती काळभैरवे क्षेत्र हे रक्षियले।
पद्मसुंदरी रमाभवानी इथेच अवतरली, उत्तरास्तव भक्ताच्या या सगुण साकारली ॥
विश्वशान्तीस्तव श्री हरी आले कृष्णारूपाने, सवेची वेण्णा अवतरली ती शिवहीरूपाने ।
ककुद्मती ती ब्रह्मतनुही भिडली प्रीतीने, रजतम विरुनी सत्वची उरले कृष्णा रूपाने ॥
चौदा भुवने द्वादश लिंगे असती या क्षेत्री, पुण्य संगमी न्हाउनी गेले सर्वही प्रीतीने ॥
Wednesday, 27 April 2011
history
कराडची उत्तरालक्ष्मी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील महत्वाचे शहर म्हणजे कराड शहर होय.पूर्वी यालाच करहाटक असे म्हणले जाई.पूर्वी शिलाहार राजाची राजवट या भागावर होती त्याची उपास्य देवता महालक्ष्मी म्हणून त्यांनी लक्ष्मीचे भव्य मंदिर उभारले होते असे सांगत्तात कि या मंदिराच्या शिखराचे प्रतिबिंब प्रीतीसंगमात दिसत असे.काळाच्या ओघात हे मंदिर नष्ट झाले आताचे छोटे मंदिर भैरोबा गल्लीत आहे आणि हीच कराडची ग्रामदेवता आहे.हिच्या परिवारात आगाशिव सदाशिव चौरोबा चंदोबा हाटकेश्वर कमळेश्वर गोळेश्वर पावकेश्वर आनंदेश्वर रेणुका धानाई दैत्यनिवारिणी इत्यादी देव समाविष्ट आहेत
Monday, 25 April 2011
Subscribe to:
Posts (Atom)