Tuesday, 17 May 2011
Sunday, 8 May 2011
varnan of uttaralakshmi
एवं श्री पीठ करहाटक,महाक्षेत्र त्रिगुणात्मक ।
महालक्ष्मी सर्व व्यापक ,वसे विश्वैक विश्वेसी ।
ऐसेही पीठीजे वसे पद्मा ,पद्मासनी सौंदर्य समा ।
पद्म हस्ता पद्मवक्त्रा पद्मनाभा पद्माक्षी वामा ।
आष्टांगी सुंदर सर्व भुषणी,पादाग्रं गुल्फ कटी कंठस्थानी ।
नासा भाळ कर्ण मस्तक वेणी ,दंड पाणी आंगोळ्या।
नासिकी शोभे जडित सुपाणी,रक्तअधर प्रवाळ वर्णी ।
दंत पंक्ती प्रकाश आननी ,उपमा उणी चंद्राची ।
भाळी कुंकुम भाळ टिळक ,निस्तेज तेथे अरुणाग्नी फिक ।
त्या महातेजी रवी मयंक ,जाहले तांटंक उभय कर्णी।
मस्तकी कुंतल नभ केवळ ,दीर्घ वेणी सलंब सरळ ।
नक्षत्र सेना मुक्ताफळ ,सह तेजाळ स्वप्रभा ।
आरक्त कंचुकी पीत वसने,देखोनी दामिनी लज्जित मने।
रमातेज चैतन्य घन ,जैसी संपूर्ण पौर्णिमा ।
एसिजे ब्र्ह्मीची चित्कळा,स्वये प्रकाशी जियेचा सकळ।
प्रभाशक्ती चंद्रार्क आनळा,नक्षत्र मेळां विश्वादी ।
सकळभागर्भ संभव स्वयंभा,भास्करादीक आभरण शोभा ।
स्वप्रभा भरुनी जगदांरंभा लंघोनी नभा उमगली ।
एसी हे रमा परावामा .ब्र्ह्मोद्भावा ब्रह्मांड प्रतिमा ।
ते रमा तेजे सौन्दर्य सीमा ,पाहता ब्रह्मा विस्मित ।
ते उत्तरा लक्ष्मी परानाम्नी ,मुळपीठ करहाटक निवासिनी ।
षोडश हस्तायुधेधारिणी ,पद्मासनी पश्चिममुखा ।
ते महालक्ष्मी आलक्ष ,लक्षिता सहस्त्राक्ष नव्हे दक्ष ।
सर्व लक्षणी दीक्षा अपरोक्ष ,भक्त कै पक्ष रक्षति ।
Wednesday, 4 May 2011
Karad History.
कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक प्रमुख शहर आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेकडे सह्याद्री पर्वताची उत्तर-दक्षिण अशी रांग आहे. खुद्द कराड शहरा पासून या पर्वताच्या रांगा फार दूर नाहीत. सातार्यासारखे अगदी डोंगराच्या कुशीत नाही, पण कराडच्या भोवती निदान तीन दिशांना डोंगर आहेत. पूर्वेला सदाशिवगड हा शिवाजी महाराजांनी वसवलेला किल्ला, दक्षिणेला आगाशिवाची प्राचीन लेणी असलेला डोंगर तर पश्चिमेला समर्थ रामदास स्वामींच्या निवासाने पावन झालेला चंद्रगिरीचा डोंगर आहे. पुण्याहून सातारा जिल्ह्याच्या अगदी मधून जाणारा प्रचंड रहदारीचा राष्ट्रीय माहामार्ग क्रमांक ४ हा कराडला थोडेसे डावीकडे ठेऊन दक्षिणेला बंगळूर कडे जातो.
प्राचीन काळापासून कराड हे एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून मानले जाते. याचे कारण महाबळेश्वरला उगम पावून दक्षिणेला जाणार्या कृष्णा व कोयना या नद्यांचा कराडला होणारा संगम हे होय. हा संगम नेहमी प्रमाणे नाही. कराडला वायव्येकडून वाहत येणारी कृष्णा नदी हि कराड जवळ एकदम पूर्णपणे दक्षिण वाहिनी होते. तर पश्चिमेकडून प्रवास करत येणारी कोयना कराड जवळ एकदम उत्तर वाहिनी होते. आणि या दोन्ही बहिणी समोरा समोर कराडलाच एकमेकांना आलिंगन देतात, हाच तो प्रीती संगम. "कृष्णा मिळाली कोयने प्रती सखे ग सुंदर संगम किती". अशी काव्ये यावर लिहिली जातात. असा समोरा समोर होणारा नद्यांचा संगम विरळा असतो. दक्षिणोत्तर आलेल्या या नद्यांचा संगम झाल्यावर एक झालेली नदी कृष्णा नावाने पूर्वेकडे जाते. व कृष्णा नावानेच बंगालच्या उपसागरात मिळते. या संगमामुळे कराड शहराच्या पश्चिमेला कोयना व उत्तरेला कृष्णा अश्या नद्या आहेत.
शिलाहारांच्या शाखेतील सर्वात प्रसिद्ध राजा म्हणजे विजयादित्त्य होय ( इ.स. ११४२-११५४). हा राजा मोठा लक्ष्मि भक्त होता म्हणून कराडला देखील त्याने एक अतिशय भव्य लक्ष्मी मंदिर बांधले. त्याचा चौथरा आजही निमजग्याच्या माळावर दिसतो. या देवळातील लक्ष्मी मूर्ती कशी होती? तर ती सुवर्ण तेजाची सोळा हातांची होती. या मंदिरात अनेक कोनाडे असून त्यात अनेक मूर्ती होत्या. त्यातील एक म्हणजे कराडच्या सोमवारपेठेच्या भैरोबा गल्लीतील उत्तरालाक्ष्मीची मूर्ती. हि मूर्ती इतकी सुंदर आहे कि त्यावरून मुळची लक्ष्मीची मूर्ती किती भव्य व सुंदर असेल याची कल्पनाच केलेली बरी. कराडला शक्तीक्षेत्र, मुक्तिक्षेत्र व सुवर्णकर क्षेत्र असे संबोधिले जात होते.
(सन्दर्भ - प्रा. देशपांडे)
Monday, 2 May 2011
Kshetra mahatmy
श्री करहाटक क्षेत्र वर्णन -
देवातामय करहाटक महास्थान , तेची निजमस्तक जाण सुजाणे ॥
हाटक लिंग ते मुगुटमणी, चि द्ररत्ने हेमी विराजे॥
त्रीपीठ लल्लाट सिहासनी .परा लक्ष्मी अलक्ष उन्मनी ॥
विराजमान ते क्षेत्रपाणी,मुख क्षेत्राचे विद्दवत जनी ॥
सव्य नेत्र तो दक्षिण केदार ,वाम नेत्र तो श्री शंभो शिंगणापूर ॥
नाशापुटे ती द्वय नरसिह्पूर,नाशाग्र तो सागरेश्वर ॥
आता क्षेत्राचे उभय कर्ण,ऐक अद्रीजे सावधान ॥
येमाई आणि पिंपळाई जाण ,उभय कर्ण साजिरे ॥
उदर संगम योगिनी वृंद ,कटी कोटेश्वर प्रसिद्ध ॥
नीळाद्री पुण्यप्रद,जानुयुग्म सरळ ते ॥
पराशर सप्त ऋषी स्थान ,हे उभय पर्वत श्री क्षेत्र चरण ॥
बद्री रामेश्वर माहुली जाण ,भुजा दोन्ही सालकृत ॥
करवीर विराट उभय ,वामदक्षिण पाणिद्वये॥
पृ ष्ठि बहुलेशा उदार्गृह स्वये .पांडुरंग नाभिस्थानी ॥
इत्यादी क्षत्र सावेव सांग ,महाबलेश आणि धारेश लिंग ॥
उभय क्षेत्राचे पार्श्व भाग ,महाक्षेत्र वर्णिले ॥ऐसे महात्म्य असे ॥
Sunday, 1 May 2011
Subscribe to:
Posts (Atom)