Thursday 28 April 2011

Aarti

श्री उत्तरालक्ष्मीदेवीची आरती

कमलनिवासिनी जय महालक्ष्मी वंदन तव पदकमला ।
विरुनी जाती षडभावची हे करीता आरतीला ॥
की जननी  तुझिया  आरतीला ॥धृ ॥
श्रीकराने भक्तीनेही शंभू तोषविला,प्रसन्न होऊनही शम्भूनेही अमर त्यास केला ।
श्री करहाटक नाव देऊनी या पुण्य क्षेत्राला,स्वये सदाशिव परिवारासवे इथेच तो रमला।
कमळेश्वर  तो कमलाहाती  श्री कर शोभविले ,क्षेत्राधिपती काळभैरवे  क्षेत्र हे रक्षियले।
पद्मसुंदरी रमाभवानी  इथेच अवतरली, उत्तरास्तव भक्ताच्या  या सगुण साकारली ॥
विश्वशान्तीस्तव श्री हरी आले कृष्णारूपाने, सवेची वेण्णा अवतरली ती शिवहीरूपाने ।
ककुद्मती ती ब्रह्मतनुही भिडली प्रीतीने, रजतम विरुनी सत्वची उरले कृष्णा रूपाने ॥
चौदा भुवने द्वादश लिंगे असती या क्षेत्री, पुण्य संगमी न्हाउनी गेले सर्वही प्रीतीने ॥

No comments:

Post a Comment