Saturday 30 April 2011

Vishnu rupini Krishna- Dakshinechi Ganga.



दक्षिण भारताची पाताळगंगा  म्हणजेच कृष्णा नदी होय .हिच्याबद्दल पुराणामध्ये अशी गोष्ट आहे कि 'प्राचीन काळी ब्रह्मदेवाने ब्र्ह्मारण्यात यज्ञ केला .या यज्ञाला तीनही देव ब्रह्मा विष्णू महेश उपस्थित होते यज्ञाच्या पूर्णाहुतीच्या वेळी सावित्री साज शृंगार करण्यात गुंतल्यामुळे वेळेवर आली नाही म्हणून गायत्रीला प्राधान्य दिल्यामुळे सावित्रीला राग आला व तिने तीनही देवाना शाप दिला कि तुम्ही सर्व जळरूप व्हाल. तिच्या शापानुसार विष्णू झाले कृष्णा नदी, ब्रह्मा झाले कोयना  नदी तर महेश झाले वेण्णा नदी. तीनही देवानी त्यांनाही प्रतिशाप दिला कि तुम्ही जळरूप व्हाल व अधोगतीला जाल. त्या प्रतिशापानुसार सावित्री,गायत्री,वाशिष्टी ई. देवता जळरूप होऊन सह्याद्रीवरून उगम पावून कोकणात वाहू लागल्या. महाबळेश्वरला पाच नद्या उगम पावतात. कृष्णा, कोयना, वेण्णा या तीन नद्या देशावर येतात, तर गायत्री व सावित्री उंचावरून खाली तळ कोकणात वाहतात. म्हणजेच अधोगतीला जातात. कृष्णा आणि वेण्णा या दोन नद्यांचा संगम श्री क्षेत्र माहुली येथे होतो, म्हणजेच हरी हर संगम. विष्णू रूपिणी कृष्णा व शिव रूपिणी वेण्णा म्हणजे हरिहर संगम झाला असे मनात खंत वाटून ब्रह्मरूपिणी कोयना वेगाने कृष्णेला कराड येथे मिळते. कृष्णा संथ या उलट कोयना वेगवान यांचा 'T' आकाराचा संगम कराड येथे होतो यालाच प्रीती संगम असे म्हणतात. हि पुराणातली गोष्ट म्हणजे भौगोलिक नकाशाच आहे. या रूपकात्मक गोष्टी मधून भौगोलिक सत्य दिसून येते.

No comments:

Post a Comment